हे आमचे कर्तव्य आहे .. निसर्ग चक्रीवादळ मदत (माणगाव)
गेली कित्येक वर्षे दुर्गवीर गडकिल्ल्यांच्यावर संवर्धन करत आहे पण कधीच आम्ही स्थानिक लोकांना दुर्लक्ष केले नाही आजवर ज्या ज्या गडावर दुर्गवीर संवर्धन करत आहे त्या गडकिल्ल्यांचे संवर्धन शक्य झाले ते या स्थानिक लोकांच्याच मूळे . निसर्ग चक्रीवादळात अनेकांची घरे उध्वस्त झाली . अनेक स्थानिकांनी आम्हाला मदतीसाठी हाक दिली इतकी वर्षे ज्याच्या घरात हक्कांने राहिलोय हक्काने पोटभर जेवलोय अश्या अनेकांची फोन आम्हाला येऊन गेले . मदत म्हणून त्यांना फक्त एक आसरा हवा होता छतासाठी … रायगडचा स्वरक्षण साखळीतील प्रथम किल्ला ज्या गडामुळे दुर्गवीरचे कार्य मोठे झाले त्याच गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या स्थानिकांची घरे सावरण्याची जबाबदारी आम्ही घेतली होती .. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मुळे आम्ही मानगडच्या पायथ्याशी राहणाऱ्या पाच ते सहा घरांना पत्रे पोच केलेत तसेच ज्या मराठे काकूंच्या घरी अनेक भटके पोटभर जेवण करतात त्या काकूंना तुमच्या मदतीने आर्थिक मदत देखील करून आलोय .. आमचे मानगडचे दुर्गवीर श्री रामजी कदम यांनी व्यवस्थित गावाची पाहणी करूनच ही मदत पोहचवली आहे ,यावेळी आमचे दुर्गवीर प्रशांत डिंगणकर , विठ्ठल केंबळे आणि विशाल बामने मदतीला होते .. मित्रांनो तुम्ही आजवर जे सहकार्य करत आहात म्हणून हे कार्य आमच्या माध्यमातून तुमच्या मदतीनेच होते असते , हे टप्प्याची मदत आहे अजून बरच कार्य बाकी आहे .. असाच विश्वास आणि साथ कायमस्वरूपी आमच्या सोबत राहू द्या .. 9833458151 | 8655823748 | 8097519700 www.durgveer.com| durgveer.com@gmail.com
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details