सामानगड येथे विद्यार्थ्यांची गड स्वच्छता मोहीम २/१/२०१८
विद्यामंदिर चन्नेकुप्पी येथील शालेय सहल सामानगड येथे दि.२/१/२०१८ रोजी आली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांनी गडावर स्वच्छता मोहीम राबवली. त्यांनी जिथे दिसेल तो प्लास्टिक कचरा, कागद,बॉटल असा अनेक प्रकारचा कचरा गोळा करून स्वच्छता केली व सहलीचा आनंद लुटला. त्यावेळी दुर्गवीर प्रतिष्ठान चे सदस्य विजयराज यांनी सर्व विध्यार्थ्यांना गडसंवर्धन काळाची गरजयाबद्दल थोडी माहिती दिली व दुर्गवीर प्रतिष्ठान च्या सुरु असलेल्या कार्याचा आढावा सांगितला व या कार्यात सहभागी होण्यासाठी सर्वांना विनंती केली. तसेच सरांनीहि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थांनी गड संवर्धन करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प केला. यावेळी विद्यामंदिर चन्नेकुप्पी येथील सर्व शिक्षक स्टाफ तसेच दुर्गवीरचे सतीश चव्हाण, मकरंद दरेकर, प्रशांत बाटे आदि उपस्थित होते.
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details