हे खरे समाधान…
अरे व्वा !!! पुन्हा नविन वर्ष!! पुन्हा नविन पुस्तके !! पुन्हा नविन कपडे !! मज्जाच मज्जा !। हे सर्व दिवस आपल्यातल्या ब-याच जणांनी अनुभवले आहेत पण अनेकजण या अनुभवापासुन वंचीत होते आणि आजहि असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना दरवर्षी नविन पुस्तक,वह्या,दप्तर क्वचितच मिळत असतील. काहींची अवस्था इतकी दयनिय आहे की त्यांना पुस्तक,वह्या दप्तर या वस्तु मिळतात की नाही अशी परिस्थिती असते. या अशा विद्यार्थांच्या मनात मात्र शिक्षणाची ओढ किंबहुना जिद्ध असते. अशा या गरिब व गरजु विद्यार्थ्यांच्या जिद्धिला सलाम करत सेवा सहयोग व दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे कोल्हापुर > गडहिंग्लज मधील नूल या गावात शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्या मुलांना हे वाटप करुन खुप काही मोठ कार्य करतोय असे अजिबात नव्हते पण त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न!!
यातुन आम्हाला काय मिळाले तर, मानसिक समाधान !! त्या मुलांना जेव्हा ते शालेय दप्तर मिळाले तेव्हा ती उघडुन पाहण्यासाठिची लगबग, दुस-याला आपल्या वस्तु दाखवताना त्यांच्या चेह-यावरचे कौतुक पाहताना जाणिव होते की चला कुणाच्यातरी चेह-यावर हसु फुलविण्यात आपण यशस्वी झालो ! !
सर्वसामाण्यपणे माणसाच्या “समाधानाची व्याख्या” असते ती “मी स्वत: सुखी आहे म्हणजे मी समाधानी आहे” !!! पण “दुस-याच्या समाधानाने आपण समाधानी व्हाव” ही माझ्या “समाधानाची व्याख्या” आहे !! बघा तुम्ही सुध्दा तुमच्या समाधानाची व्याख्या बदलुन पहा ! दुस-याच्या समाधानात तुमच सुख मिसळुन पहा !!
जय शिवराय
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details