तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखणा, सुंदर आणि मजबूत असा रामगड किल्ला . गेली ५ वर्षे दुर्गवीर च्या माध्यमातून इथे अनेक संवर्धन मोहिमा झाल्या . गड झाडीच्या गर्दीत हरवुन गेला होता तो प्रत्येक मोहीमेत उजेडात येऊ लागला . त्याचा भव्य पणा येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पाहता येऊ लागला . सध्या जगावर आलेल्या संकटामुळे आम्हा दुर्गवीरांना घरी बसावं लागलं . संवर्धन कार्यासाठी हाती घेतलेल्या सर्व किल्यांचं काम थांबल. संकट थोडं कमी झाल्याने आपण सर्व नियम पाळून पुन्हा संवर्धन कार्याचा शुभारंभ केला . दुर्गवीर च्या स्थानिक टीम ने रविवारी रामगड वर संवर्धन मोहीम केली , ह्यामध्ये महादरवाजा इथे वाढलेली झाडी तसेच गवत कापून आपण गडाचा दरवाजा ,बुरुज व आतील भाग स्वच्छ केला . ह्या मोहिमेत रामगड येथील स्थानिक , कणकवली , वैभववाडी येथील दुर्गवीर उपस्थित होते . येत्या विजयादशमी ला रामगड ला तोरण बांधून आपला सण साजरा करणार आहोत . स्थानिक तसेच जिल्ह्यातील गडकिल्ले प्रेमी उपस्थित राहून या कार्यात आपला हातभार लावू शकता . अधिक माहिती लवकरच देऊ . अधिक माहिती साठी संपर्क – 7977595345, 8600346783
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details