दुर्गदुर्गेश्वर रायगडच्या महादरवाजातुन समोर पाहिलंत तर एक डोंगरांचं शिखर नजरेस पडतं, त्याच नाव कोकण दिवा त्याच्या डाव्या बाजूने एक घाटवाटा खाली उतरले, तीच नाव “कावल्या घाट” . ती जिथून सुरु होते, त्या जागेला म्हणतात कावल्या-बावल्याची खिंड, हे सारं तुम्हाला परिचित आहेच पण इथे या स्थळीच घडलेल्या पराक्रमाने अवघ्या हिंदुस्थानचा इतिहास बदलला असता . ज्या प्रमाणे घोडखिंडीने बाजीप्रभुंचा पराक्रम पहिला तेवढाच पराक्रम या कावल्या-बावल्या खिंडीने पाहिला, शहाबुद्दीनखानाच ३०० सैनिकांचे वादळ अवघ्या चार पराक्रमी हातांनी परतवुन लावलं
बाजी- फुलाजी-तानाजी-शिवा-कोंडाजी अश्या साऱ्यांची आठवण करून गोंदाजी जगताप आणि सरकले नाईक यांनी तीनशे सैन्य याच रणक्षेत्री कापून काढले परिणामी राजाराम महाराज कड्यावरून सुरक्षित वाटेने सुटले.. केवढा हा पराक्रम , अशी ही जागा , पण ती आपल्याला माहित असू नये ? ..
म्हणतात ना आपल्या स्वत्वाची बीजे इतिहासात सापडतात , तो इतिहास नुसता वाचायचा नसतो ,तर पुढल्या पिढीच्या मनात पेरायचा असतो , ..
या पराक्रम आणि शौर्याची जाणीव प्रत्येकाला व्हावी याच हेतून आम्ही या वीरांना मानवंदना देतोय २४ मार्च २०१९ रोजी
मराठयांच्या इतिहासात लढलेल्या एका अद्भुत पूर्व अश्या रणसंग्रामाची साक्ष आहे ही कावला-बावला ची खिंड. गोदाजी जगताप व सर्केल नाईक यांच्या भीष्म पराक्रमाने पावन झालेली ही खिंड आजही दुर्लक्षित आहे , दुर्गवीर प्रतिष्ठानने या दुर्गम्य इच्छाशक्ती व पराक्रमाला मुजरा करण्यासाठी एक अभिवादन मोहीम दिनांक २४ मार्च रोजी आयोजित केली आहे . आपण साऱ्या इतिहास आणि त्यांच्या पराक्रमांचे पाईक म्हणुन मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे हि विनंती …..
दुर्गवीर संपर्क 8108366447 8007930210
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details