पाया संवर्धनाचा….
कोकण म्हणजे महाराष्ट्राच्या विविधतेला सुंदरता बहाल करणारे एक सुंदर फुल आहे . पण याच कोकण भूमीत अनेक गडकिल्ल्याची दयनीय अवस्थेत आहे , इथले भग्न ऐतिहासिक वास्तूकडे पाहून इथले वैभव आठविल्या शिवाय रहात नाही .
यात याच कोकण मधील राजापूर जवळ यशवंतगड नावाचा वर्षोनुवर्षे पुरातन अवशेषांचे ओझे घेऊन खितपत पडलेला होता. जांभ्या दगडाचा साज सजलेला हा गड पुरातन काळी अर्जुना खाडीवर लक्ष देत असत ,पण आपल्या अनास्थेमुळे हा यशवंगड स्वतः दुर्लक्षित झाला .
याच यशवंतगडाच्या स्वरक्षणासाठी आम्ही दुर्गवीर पुढे सरसावलो….
२४ – २५ नोव्हेंबर ला स्थानिकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम देखील झाली. गडाचे दरवाजा , गडाचे तट , चौथरे स्वच्छ करण्यात आले.
दोन दिवसाची मोहीम झाली हे बोलण्यात इतपत खरंच सोप्पे कार्य नसते ..
या मोहिमेच्या मागे प्रचंड मेहनत आहे , सहनशिलता आहे .
एखादा गड निवडुन , हत्यारे घेऊन गडावर गेलो म्हणजे संवर्धन होत नाही .त्याची पूर्व तयारी करणे महत्वाचे असते..
गेल्या वर्ष भरा पासून आमचे दुर्गवीर अजित राणे आणि निल मयेकर यांनी नाटेगावात अनेक ठिकाणी सातत्याने अनेक लोकांशी संवाद साधत होते ,अनेकांना गडाचे महत्व आणि त्यामागची भावना समजून सांगत होते..
या आमच्या हाकेला ओ देत.. नाटे गावातील ग्रामस्थ मंडळी यांनी आमच्या सोबत उभं राहण्याची तयारी दाखवली…..
आणि सोबतिने गडाच्या स्वच्छते साठी पुढे सरसावले .
जागतिक वारसा दिनाचे निम्मित साधून २४ -२५ तारखेला ३० पस्तीस लोकांचे हात गडावर राबले..
या दिवशी खऱ्या अर्थने ” यशवंतगडाचा संवर्धनचा पाया ‘ घातला गेला…
मित्रांनो ,
या गडाच्या परिसरात राहणाऱ्यांनी , तसेच जवळपासच्या गावातील लोकांची आम्हाला गडाच्या कार्यासाठी आम्हाला नक्की संपर्क करा ..
दुर्गवीर प्रतिष्ठान
9833458151
8097519700
आपण आम्हाला आर्थिक मदत देखील करू शकता ..
DURGVEER PRATISTHAN
Bank of Baroda ,
Branch : Chandavarkar road
Account number :
04060100032343
IFSC : BARB0CHANDA (fifth character is zero )
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details