महाराष्ट्रदिन २०१७ : रामगड कणकवली येथील आचरे मार्गावरील रामगड , दोन वर्षांपूर्वी गुढी पाडवा देखील याच किल्ल्यावर साजरा झाला होता ,पण यंदा हा ” महाराष्ट्रदिन साजरा ” करण्याचे मुख्य कारण म्हणजे हा किल्ला स्थानिक लोकांच्या करवी ” संवर्धनास “घेणे ..त्यांच्या मनात या किल्ल्या विषयी जागृती तसेच या गडकोटांचे महत्व पटवून देण्यासाठी ” महाराष्ट्रदिनाचे ” आयोजन या किल्ल्यावर करण्याचे ठरले होते . माहिन्याभरा आधीच या किल्ल्या संबधी बोलणी सुरू झाली , गडाची अवस्था , करावयाचे काम , फुल , मशाली, स्थानिकांना एकत्र करूने.. ३० एप्रिल ला गडाची भेट घेतली ,तेव्हा त्याचा दरवाजा ,बुरुज सारे सारे झाडी आणि वेलींनी व्यापले होते , किल्ल्याचे किल्लेकरी ” श्री प्रभू देसाई ” यांनी आम्हाला साहित्य सहित गावातील अनेक लोक या गडाच्या काया पालट साठी मदतीला दिले ,संपूर्ण दिवस भर गडावर श्रमदान झाले , न दिसणारा संपूर्ण बुरूज दिसू लागले ,सायंकाळी 5 ला श्रमदान थांबले आणि तयारी सुरु झाली ती , रात्रीच्या अंधारात दिव्या आणि मशालींनी गड उजळण्याचा , स्थानिक आणि जवळील गावातून मिळून 30 एक लोक गडावर हजर होती .. हळू हळू एक एक पणत्या आणि मशालीं उजळू लागल्या आणि गडावर सर्वत्र आनंदी वातावर सुरु झाले , महाद्वार ,बुरुज ,तटवरील एक एक पणती आपल्या प्रकाशाने गड उजळात होती .. त्यांच्या निरोप उद्याच्या महत्वाच्या तयारी पा सुरवात झाली १ मे महाराष्ट्रदिन .. पहाटे मुंबई आणि कोल्हापूर वरून आणलेले झेंडू ची फुलाच्या माळ ओवणे सुरु झाले , कोणी भगवी पताका लावतोय ,तर महिला रांगोळीने गडाचा उंबरठा सजवित होते . हळू हळू साऱ्यांच्या मदतीनर रामगड संपूर्ण सजला , आणलेल्या शिवप्रतिमेला आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्यांना स्मरण करून या महाराष्ट्रदिनाची सांगता झाली . धन्यवाद : दुर्गवीर प्रतिष्ठान
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details