दूधनाका गणेश प्रेमी मंडळ, कल्याण येथील गडजनजागृती अभियान २०१४
दूधनाका गणेश प्रेमी मंडळ,कल्याण येथील गडजनजागृती अभियान २०१४
”महाराष्ट्र” म्हणजे जाज्वल्य पराक्रम लाभलेली हि पावन भूमी . भौगोलिक, ऐतिहासिक वारश्याबरोबर सांस्कृतिक वारसा देखील “महाराष्ट्रला ” लाभलेला आहे….
त्यातील गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे सर्वांचा लाडका .. हे गणपती बाप्पाचे ११ दिवस म्हणजे सर्वत्र जल्लोष… अश्या सणातून लोक एकत्र येतात पण आज किती गणेशोस्तव मंडळे या एकत्रित लोकांसाठी ,सामाजिक उपक्रम किंवा समाज प्रबोधानात्मक कार्यक्रम राबवतात….फारच कमी…
एक काळ असा होता कि गणपती च्या दिवसात लोकांना मध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तश्या पद्धतीचे देखावे साकारले जातात पण या काही वर्षात आपण जे काही पाहतोय त्यांनी असेच वाटू लागते कि हि आपली “संस्कृती ” कुठे तरी लोप पावून तिचे रुपांतर “Event ” मध्ये झालय … पण काही मंडळ त्याला निश्चित अपवाद आहे .… त्यातील एक मंडळ म्हणजे कल्याण येथील “दूधनाका गणेश प्रेमी मंडळ” ..
शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजची गड-किल्ल्यांची अवस्था पाहता या मंडळाने ”किल्ले संवर्धन” हा विषय घेवून अत्यंत सुंदर पद्धतीती लोकांना समोर मांडण्याच्या यशस्वी पर्यंत केला ।
अत्यंत सुंदर प्रकारे देखावे उभारण्यात आले . गड-किल्ल्यांची छायाचित्रे , राजियाचा गड राजगडाची प्रतीकृती , मनाला छेदणारे आवाहनात्मक करणारे फलक संपूर्ण परिसर “गड कोट आणि किल्लेच “…
छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी पराक्रमाने उभ्या हिंदुस्थानाला एक आदर्श दिला. शिवरायांनी आणि त्यांच्या शिलेदारांनी स्वराज्याचे देखणे स्वप्न सत्यात उतरवले. ज्या गडकोटाच्या बळावर राजांनी हे स्वप्न साकार केले त्या गडकिल्लांची अवस्था आज मात्र फारच दयनीय आहे.पण गेली ६ वर्ष गड संवर्धनासाठी झटणारे दुर्गवीर प्रतिष्ठान हे कुटुंब आपल्या शिवकार्याचा वसा समर्थपणे पुढे नेत आहेत.
किल्ले संवर्धन करण्याची गरज किती आहे व का आहे हे तरुण पिढीला समजावण्यासाठी व त्यागोष्टीशी एकरूप होण्यासाठी मंडळातर्फे पेशवेकालीन “बालाजी मंदिरात ” #दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्याची छायाचित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे काम करत असलेल्या गडाची माहिती आणि इतिहास सांगण्यात आला.चित्रस्वरुपात गडावरील वास्तूंची सद्यस्थिती आणि त्यांचा इतिहास तसेच गडाची स्थिती याची जाणीव करून दिली. दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे चालू असलेले सुरागडावरील पाण्याची टाक्याची होत असलेली सफाई, पायवाटेचे काम, मिळालेल्या जात्याचे अवशेष, मानगडावरील शोधलेला दिंडीदरवाजा, मानगडावरील जात्याचे अवशेष,टाक्याची सफाई, दिशादर्शक फलक मोहीम तसेच अवचीतगडावरील पाण्याची टाक्याची सफाई, तटबुरुजावरील केलेली झुडुपांची सफाई याची माहिती करून देण्यात आली. दरवर्षी दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे काम करत असलेल्या गडावर साजरे करण्यात येणारे महाराष्ट्र दिन सोहळा, गुढीपाडवा, दसरा या सणांची तसेच आदिवासी गरजू शाळेतील मुलांना करण्यात येणारे मोफत दप्तर व गणवेश वाटप याची माहिती देण्यात आली.कार्यक्रमाला तरुणांचा, महिलांचा आणि लहान मुलांचा चांगला प्रतिसाद होता.
हि जनजागृती अभियान घेण्याचा उद्धेश हाच होता कि शहरातील तरुणांचा आपल्या पुढील पिढीसाठी आणि स्वराज्याचा शिलेदाराला पुन्हा ताठ मानेने उभे करण्यासाठी त्यांचा या शिवकार्यासाठी हातभार लागावा….
!! जय शिवराय !!
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details