इंग्रज व सिद्दी यांना शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी थळ जवळील खांदेरी बेटावर किल्ला बांधला. ह्या जलदुर्गामुळे इंग्रज व सिद्दी यांच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणे मराठ्यांना सहज शक्य होते. त्यामुळे इंग्रज व सिद्दी अस्वस्थ झाले. खांदेरीच्या ह्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आणि मराठ्यांच्या समुद्रातील हालचालींना चाप लावण्यासाठी सिद्दीने खांदेरी पासून दीड किमी अंतरावर असलेल्या उंदेरी बेटावर किल्ला बांधला. हा किल्ला खांदेरी बेट व खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) ह्यांच्या दरम्यान असल्यामुळे उंदेरीचा किल्ला बांधल्यापासून सिद्दी व मराठे यांच्यात कायम चकमकी होत राहील्या.
दिनांक १५ एप्रिल रात्री निघुन १६ एप्रिल ला रात्री परत येणे असे ह्या मोहिमेचे स्वरूप राहील.
वेळापत्रक :
भेटण्याचे ठिकाण : दादर पूर्व स्वामी नारायण मंदिर जवळ
दिवस पहिला : १५ / ४ /२०१७
रात्री ११:०० वाजता दादर येथून खाजगी वाहनाने प्रस्थान
दिवस दुसरा : १६ / ४ /२०१७
पहाटे मुक्काम स्थळी पोहोचू
सकाळी ७ :०० वाजता नाश्ता करून दुर्ग खान्देरी उंदेरी कडे प्रवास सुरु होईल
उंदेरी दुर्ग भ्रमंती
खान्देरी दुर्ग भ्रमंती
इतिहास
दुर्गभ्रमंती मध्ये खांदेरी व उंदेरी* याचा समावेश आहे
*उंदेरी किल्ला भ्रमंती भरती -ओहोटी वर अवलंबून आहे
दुर्गभ्रमण फी :- १४०० /- रु
यामध्ये १ वेळचे जेवण (शाकाहारी) आणि सकाळचा चहा-नाश्ता व संध्याकाळचा चहा तसेच होडी प्रवास व मुंबई ते मुंबई प्रवास शुल्क
Guide and Expertise Charges याचा समावेश असेल.
दुर्गभ्रमणात मद्यपान आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे.
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details