गडाच्या घेऱ्यातील गरजूंना गृहउपयोगी वस्तू व फराळाचे वाटप
काहीतरी दिल्यावर खूप काही मिळविण्याचा आनंद (कुंभाघाट गृहउपयोगी वस्तू व फराळ वाटप – २४ / १० / २०१४)
आपण स्वता दिवाळीत खूप फराळ खातो, खूप फटाक्यांचा धूर उडवतो. पण ज्यांच्या आयुष्यात एक वेळच्या जेवणाची भ्रांत असते त्यांच काय?? त्यांची दिवाळी कशी साजरी होत असेल. फटाके म्हणजे काय ?? कदाचित हे सुद्धा माहित नसलेले आदिवासी लोक !! कशी साजरी होत असेल त्यांची दिवाळी….
हाच विचार मनात ठेवून Mountain Sports Academy Adventure Hub चे नंदू चव्हाण यांनी त्यांच्या दुर्गप्रेमी परिवाराल एक आवाहन केले ते
“Utensils Kit Challenge”
(https://www.facebook.com/photo.php?fbid=797943890258315&set=a.127640003955377.42961.100001281352650&type=1&theater)
त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दुर्गप्रेमींनी केलेल्या मदतीमधून नंदू चव्हान यांनी गडाच्या परिसरातील गरीब कुटुंबियांना गृहउपयोगी वस्तूंचा हा संच देण्याचा संकल्प केला आणि हा संकल्प त्यांनी दुर्गवीर च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा विचार केला त्या बद्दल श्री नंदू चव्हान यांचे खास आभार
दुर्गवीरच्या शिलेदारांनी कुंभाघाट > माणगाव येथीलकुंभागाव व कुंभेवाडी येथील ५० कुटुंबियांना गृहपयोगी वस्तूचा संच व फराळ वाटप करण्यात आले. तसेच तिथूनच जवळ असलेल्या हर्णे गावातील आदिवासींनाहि फराळ वाटप करण्यात आले.
दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे गरजू / गरीब कुटुंबाना गृहपयोगी वस्तू व फराळ वाटप करण्यात आले. सदर गृहुपयोगी वस्तूंच्या संच मध्ये “१ स्टील ताट, १ ग्लास, वाटी व चमचा अश्या वस्तू सामविष्ट होत्या. सदर संच हे नंदू चव्हाण (Nandu Chavan) व त्यांच्या Mountain Sports Academy Adventure Hub
(https://www.facebook.com/mtsportsacademy) (http://www.mtsportsacademy.com/)तर्फे हे संच पुरविण्यात आले. त्याबद्दल दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे नंदू चव्हाण यांचे शत:शा आभार.
या गृहउपयोगी वस्तूंच्या संचां सोबत दुर्गवीर प्रतिष्ठान च्या आवाहना नंतरअवघ्या काही तासात तब्बल ५०. पेक्षा जास्त कुटुंबियांच्या फराळ उपलब्ध करून दिलेल्या अनेक ज्ञान- अज्ञात शिवप्रेमींचे खुप खूप आभार.
या आदिवासी / गरीब कुटुंबियांना ह्या वस्तू व फराळ उपलब्ध करून दिल्यावर त्यांच्या चे-यावरील आनंद हिच दुर्गवीरांसाठी या दिवाळीची “भेट” मोहीम पूर्ण केल्यावर दुर्गवीरांनी अनुभवला तो “काहीतरी” दिल्यावर “खूप काही मिळविण्याचा आनंद”
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details