सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मालवण तालुक्यातील रामगड या नावानेच असलेल्या गावात अजुनही सुस्थितीत असलेली तटबंदी, मुख्य प्रवेशद्वार, तोफा,आणि काही वाड्यांचे अवशेष असलेला रामगड किल्ला. होय ज्याची कल्पना आम्हाला काम करतानाही आली नव्हती की या गडावर इतकं काही गर्द झांडीच्या मागे हे सर्व लपलेय. ७ वर्षांपूर्वी गुढीपाडवा साजरा करायच्या निमित्ताने कोकणातील मालवण तालुक्यातील या रामगडाची निवड झाली. त्या दिवसापासून आजगायत गडावर असंख्य श्रमदान मोहिमा झाल्या बऱ्याच वास्तू मोकळ्या केल्या..
इतकंच नाही तर गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन ,दसरा हे सर्व सण दोन – दोन दिवस थांबुन मशाली,पणत्या,रांगोळ्या काढून अशी विविध सजावट करून मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरे होऊ लागले.आजूबाजूच्या भागातून बरेच तरुण तरुणी यात आता सहभागी होऊ लागलेत. जो गड काहीशे वर्षांपासून गर्द झाडीत झाकून गेला होता तो आता मात्र आपलं वैभव दिमाखात दाखवत उभा आहे.
या मोहिमेत तटबंदी आणि दरवाज्याची स्वच्छता करण्यात आली ,खरतर आम्हाला साथ हवी तू तुमचीच, भविष्यात या गडाचे चांगल्या पध्दतीने संवर्धन होईल त्याकडे आमचा कल असेल. आपण सर्व या कार्यात सहभागी व्हा जमेल तिथं आणि जमेल तसं.. रामगड श्रमदान मोहीमेत सहभागी झालेले दुर्गवीर