दि. १७\१०\२०२० रोजी घटस्थापनेचे औचित्य साधून किल्ले महिपत गड, तालुक- खेड वर प्रथम संवर्धन मोहीम संपन्न झाली. यावेळी गडावरील दक्षिण दरवाज्या जवळ असलेल्या मारुती आणि गणपती मूर्तींची आणि चौथराची साफ सफाई करण्यात आली. आणि त्यानंतर गडदेवता, मारुती आणि गणपतीची पुजा करुन कामाला सुरुवात केली. रोहित बालडे यांनी ध्येय मंत्र म्हटले. आणि सौरभ भोसले यानी गारद दिली. त्यामुळे काम करण्यासाठी अजुनच स्फुर्ती आली. दक्षिण दरवाजा हा पुर्णपणे झाडा- झुडपांनी भरलेला होता. त्याला मोकळ करण्यात आलं. त्यावेळी एक दगडी चाक निदर्शनास आलं. दुपारनंतर गडावरील पारेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आम्ही गड पाहण्यासाठी गलो. स्थनिक पोलिस पाटिल श्री. डी.एस. जाधव यानी गडावरील कोतवाल दरीच दरवाजा आणी तेथून दिसणार्या विस्तीर्ण प्रदेशाची माहिती दिली. सदर मोहिमेमध्ये श्री. रोहित बालडे, श्री. सौरभ भोसले, सौ. भोसले, विपुल भोसले, राकेश इंदुलकर, सौ. इंदुलकर आणि दोन छोटे दुर्गवीर श्रीरंग आणि वृंदा यांनी सहभाग घेतला होता त्याचबरोबर विठ्ठल केंबळे हे माणगाव वरुन बाईक वरुन प्रवास करुन या मोहिमेमधे सहभागी झाले होते. येत्या शनिवार आणि रविवारी दि. (२४\१०\२०२०) – (२५\१०\२०२०) रोजी आपण किल्ले महिपत गड वर दसरा मोहोत्सव साजरा करणार आहोत. तरी जवळपासच्या दुर्गवीरांनी आणि शिवप्रेमीनी या मोहिमेमधे सहभागी व्हा. धन्यवाद…..
कोण आहेत दुर्गवीर
Donation
If you are interested for donation, We have 80G Certified,
Click here for more details