किल्ले कलानिधीगड श्रमदान मोहीम – ७ फेब्रुवारी २०२१
दि.७ फेब्रुवारी २०२१ रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे किल्ले कलानिधीगड (ता.चंदगड) येथे झालेल्या मोहिमेत गणेश दरवाजा तटबंदी जवळील दुर्गवीरांनी श्रमदान करून काळाच्या ओघात लुप्त झालेल्या शिवकालीन सौचकूप शोधून काढण्याचं कार्य दुर्गवीरांनी केलेलं आहे… तसेच किल्ल्यावर साठून राहिलेले पावसाचे पाणी किल्ल्याच्या बाहेर वाहून नेण्यासाठी तटबंदीमध्ये बनवलेली सार मोकळा केला आणि गणेश दरवाजा जवळील चौकीच्या बाजूला असलेल्या तटबंदी मधील पायऱ्या पूर्णपणे माती आणि दगडानी बुजून गेल्या होत्या त्यांना मोकळा श्वास देण्यात आला. सातत्याने होणाऱ्या मोहिमेत ज्या शिवभक्तांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी दुर्गवीर प्रतिष्ठान शी संपर्क करावा अस आवाहन करण्यात येत आहे…