महाराष्ट्रातील तमाम मराठीजनांचा मानाचा पहिला सण गुढीपाडवा
या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरादाराला तोरण बांधतात पण… एक तोरण स्वराज्याच्या शिलेदारालाही लागलेच पाहिजे या शिव आदयेने दुर्गवीर प्रतिष्ठान दरवर्षी गुढीपाडवा गडावर साजरा करतात. गडाच्या दरवाज्याला तोरण बांधून, राजांची प्रतिमा स्थानापन्न करून शिवपूजा आणि गडावरील तोफेची शस्त्रपूजा करून मोठया उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात येतो.
शिवराजाभिषेक
हा असा दिवस जो अखंड हिंदुस्थानातील हिंदूंना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यात आली. स्वातंत्र्याची पहिली अग्निज्योत माझ्या राजाच्या राज्यभिषेकाने संपूर्ण हिंदुस्थान भडकली आणि या धक्काने हिंदुस्थानातील चारही पातशाह्या डळमळल्या. हो… मराठी अस्तित्वाचा सुवर्णदिन कारण याच दिवशी शिवरायांनी स्वराज्याला एक गादी, एक विश्वास, एक आदर्श निर्माण करू दिला. सर्व धर्मांना सामाऊन घेत त्या अत्याचारित धर्मांध पातशाह्याना धडकी भरवली ती आजतागायत…..दुर्गवीर प्रतिष्ठान दरवर्षी हा शिवराज्यभिषेक दिन कोणत्याही तारखेत गुंतून न राहता एका दिवशी शिवभूमी रायगडावर राज्यभिषेक सोहळ्यासाठी जातात. उद्देश एकच कि जास्तीत जास्त शिवभक्तांनी तो सुवर्ण सोहळा किल्ले रायगडावर याची डोळा याची देही पाहता यावा तसेच त्यादिवशी देखील दुर्गवीर प्रतिष्ठान रायगडावर जमेल त्या प्रकारे श्रमदान करतात कारण दुर्गसंवर्धन म्हणजेच दुर्गवीर प्रतिष्ठान आणि दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणजेच दुर्गसंवर्धन.
महाराष्ट्रदिन… मराठी मनाचा मानबिंदू
दुर्गवीर प्रतिष्ठान दरवर्षी महाराष्ट्रदिन श्रमदान करत असलेल्या गडावर साजरा करतात. स्वराज्याच्या साक्षीदारालाही हा दिवस कायम लक्षात राहील असा साजरा करण्यात येतो.
रात्री दरवाज्यावरती मशाली आणि तटबंदीवर पणत्या उजळवून गडासोबत आम्ही शिवकाळात विहार करतो.
रांगोळ्या काढून, शिवप्रतिमा स्थापन करून शिवगर्जनेच्या घोषात शिवपूजा केली जाते अशाप्रकारे महाराष्ट्र दिन संस्मरणीय केला जातो.
शिवजयंती
गावपातळीवर तसेच शहरात देखील दुर्गसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी सांताक्रूझ वाकोला ब्रिज येथे शिवजयंती मोठया उत्साहात पार पाडण्यात येते.
दुर्गसंवर्धन छायाचित्र प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, इतिहासावरील व्याख्यान, दुर्गसंवर्धन चलचित्र माहितीपट तसेच लेझीम, गडावर ऐतिहासिक शस्त्रांच्या खेळाचे प्रात्यक्षिक, इतिहासकालीन नाण्याचे प्रदर्शन व व्याख्यान असे उपक्रम राबवत जातात.