खरंतर स्वच्छता राखणे हे आपल्या देशातील प्रथम कर्तव्य आहे , फक्त तेच कर्तव्य आम्ही दुर्गवीर गडकिल्ल्यावर नियमितपणे राबवत असतो .
कणकवली येथील रामगड अतिशय देखणा आणि अवशेष संपन्न किल्ला, गडाच्या वास्तू इतक्या सुरेख आहेत की प्रेमात पडाल, कोकणाला निसर्गाने दैवी देणगीच दिली आहे त्यावर मुकुट शोभतात ते शिवछत्रपतीच्या गडकिल्ल्यांचे ,गेल्या ३ वर्षापासून दुर्गवीर प्रतिष्ठान स्थानिक लोकांना हाताशी घेऊन गडावर स्वच्छता मोहिम राबवत आली आहे.