कृष्णाची आणि सुदामाची मैत्री तर प्रत्येकालाच माहीत आहे. पण सह्याद्रि आणि गडकोटांची मैत्री आजकालच्या लोकांना अजुन समजलीच नाही. ते आजही आपल्या पाठीशी एका मित्रासारखे खंबीरपणे उभे आहेत. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये ह्या किंल्ल्याचा सिंहाचा वाटा आहे(कधीरी म्हातारे न होणारे सिंह) अस म्हटल तरी चालेल. पण ते कधीही म्हातारे होणार नसले तरी ते आज शेवटची घटका मोजत आहेत. त्यांच्या अंगावर खुप घाव आहेत. आणि ते आजही सोसत आहेत. आता वेळ आहे त्यांना मलमपट्टी करायची, त्यांच हरवलेल वैभव परत निर्माण करण्याची.
किल्यांना त्यांच मुळ रुप प्राप्त करुन देण्यासाठी दुर्गवीर गेले आठ वर्षे किंल्ल्यावर संवर्धनाच काम करत आहे. रविवार दि. ७/०८/२०१६ रोजी किल्ले भिवगडवर मोहीम करण्यात आली. गडावर पायवाट बनवण्यात आली. गडावर ३० झाड लावण्यात आली. गडावरची मुळ पायवाट नष्ट झाली आहे. डोंगरामध्ये पायवाट तयार करण्यात आली. गडावर डोंगर माळावर आंब्याची झाड लावण्यात आली.
दुर्गवीर तर्फे अशा विविध गडावर संवर्धन मोहीमा राबवण्यात येतात. प्रत्येक रविवारी तीन ते चार किंल्यावर मोहीमा असतात. हे एक दोन हातांनी होण्यासारखे कार्य नाही आहे. त्यासाठी असंख्य हातांची गरज आहे. तर मग या आमच्या सोबत आणि द्या तुमचा एक दिवस गडसंवर्धनासाठी.